Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 18 ते 21 मार्च दरम्यान वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; विदर्भात गारपीट चा IMD चा अंदाज

महाराष्ट्रात अनेक भागंत सध्या 38 अंश सेल्सियस पेक्षा अधिकच तापमान नोंदवण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये मुंबई सह अनेक शहरांमध्ये सध्या सूर्यनारायण आग ओकत असताना राज्यात 18 मार्चपासून पावसासह वीजांचा कडकडाट (Thunderstorm) आणि गारपीट (Hailstorm) होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार 18 ते 21 मार्च हे तीन दिवस पावसाचे ठरू शकतात. या काळात महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण परिसरात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. असा अंदाज IMD ने जारी केल्याने नगारिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मार्च ते मे हा पूर्वमोसमी पावसाचा काळ समजला जातो. या तीन महिन्यांच्या काळात वाढत्या उष्णतेमुळे समुद्रामधून बाष्प निर्मितीमुळे कमी दाबाचापट्टा निर्माण होतो. सध्या पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतामध्ये देखील अनेक राज्यांमध्ये हा पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातही 3 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये विदर्भात गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

KS Hosalikar Tweet

महाराष्ट्रामध्ये उन्हाळा चढत आहे. अनेक ठिकाणी उष्णता वाढत असल्याने नागरिक होळीपूर्वीचा उष्णतेने हैराण झाले आहेत. मुंबई मध्येही 13 मार्च दिवशी यंदाच्या सीझन मधील सर्वात उष्ण दिवस नोंदवण्यात आला आहे. या दिवशी मुंबईचं तापमान 38.2 डिग्री सेल्सियस इतकं नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रात अनेक भागंत सध्या 38 अंश सेल्सियस पेक्षा अधिकच तापमान नोंदवण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif