Maharashtra Weather Forecast: कोकण, गोवा सह महाराष्ट्रात पुढील 48 तास पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज

राज्यातील सुमारे 18 विविध जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 दिवस पावसाचे असणार आहेत.

Rainfall in Mumbai | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

महाराष्ट्रामध्ये क्यार वादळाचा धोका टळला असला तरीही अद्याप ढगाळ वातावरण आहे. आता 'महा' या चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहणार असून हवामान खात्याने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यंदा मुंबई, कोकणासह विदर्भ आणि मराठवाडा या भागातही पाऊस बरसला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील काही दिवस वादळी पाऊस कोसळणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. राज्यातील सुमारे 18 विविध जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 दिवस पावसाचे असणार आहेत.

महाराष्ट्रात यंदा मान्सून रेंगाळल्याने वातावरण विचित्र झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वातावरणातील विचित्र बदलांमुळे रोगराई, व्हायरल इंफेक्शनदेखील वाढले आहे. मुंबई, पुणे यासारख्या शहरामध्ये सकाळी हवेत गारवा आणि दुपारी तीव्र ऊन पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

स्कायमेटचा अंदाज

पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, नागपूर, उस्मानाबाद, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने 'यल्लो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागात वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.