Maharashstra Monsoon Weather Forecast: पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर 18-19 ऑगस्टसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

यामध्ये अंदाजे 4.42 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

Maharashstra Monsoon Update and Weather Forecast:  महाराष्ट्रामध्ये यंदा चांगला पाऊस बरसणार असल्याचा हवामान वेधशाळेने वर्तवला होता. त्यानंतर आता राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच पुन्हा दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये यंदा चांगला पाऊस बरसला आहे. दरम्यान हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली सह पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीजवळील शहरांनादेखील 18 आणि 19 ऑगस्ट दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई शहरांत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. मध्य, पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासून जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे शहरामध्ये आज दिवसभर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई शहरांत आज सकाळी 11.39 च्या सुमारास भरतीची वेळ आहे. यामध्ये अंदाजे 4.42 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र मान्सून अपडेट

मुंबई मान्सून अपडेट

दरम्यान पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली मध्येही अनेक नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती असल्याने नागरिकांना इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम देखील करण्यासाठी एनडीआरएफ तैनात आहे.