Maharashtra Weather Forecast: हवामान खात्याचा मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग ला ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी साठी रेड अलर्ट; 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा
मात्र संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील 24 तासांत अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Mumbai , Thane, Konkan Latest Weather Forecast: बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे ऐन ऑक्टोबर महिन्याच्या मध्यामध्येही पावसाचं धूमशान सुरू आहे. दरम्यान हैदराबादला मागील 2 दोन झोडपल्यानंतर आता या महाराष्ट्रातही जोरदार पाऊस बरसत आहे. काल (14 ऑक्टोबर) रात्री मुंबई, पुण्यामध्ये वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांच्यासोबत मुसळधार पाऊस बरसला आहे. आज (15 ऑक्टोबर) च्या सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने मुंबईकरांना सध्या दिलासा आहे. आज मुंबईमध्ये सूर्यदर्शनही झाले आहे. दुपारी हवामान वेधशाळेने प्रसिद्ध केलेल्या नव्या अंदाजपत्रानुसार आता मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindudurg) या पश्चिम किनारपट्टीवरील मुख्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे तर कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील 24 तासांत अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात पुणे, मराठवाडा, उस्मानाबाद, सोलापूर मध्ये मागील काही दिवासांपासून तुफान पाऊस बरसत आहे. ओढ्यांना नदीचे स्वरूप आलं आहे तर धरणांमधूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वदूर जोरदार पाऊस बरसत असल्याने नदी काठच्या अनेक गावांना पुराचा वेढा आहे. अति गंभीर परिस्थिती बनलेल्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे. तर इतरत्र नागरिकांना घराबाहेर पडताना सुरक्षेची काळजी घेण्याचं वारंवार आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात यंदा सर्वत्र सरसरीपेक्षा अधिक पासून झाल्याने पाणीसाठा मुबलक आहे पण बाजरी, ऊस, सोयाबीन सह अनेक फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Pune Rains Update: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शरद पवार यांची बारामती तुडूंब, अनेक घरांत पाणी शिरले, इंदापूरात 40 जणांचे प्राण वाचवले.
महाराष्ट्र हवामान अंदाज 2020
महाराष्ट्रात आज सकाळी 8.30 पर्यंत मागील 24 तासांत सोलापूरमध्ये 82 मीमी, ठाण्यात 78 मीमी, पुण्यात 112.1मीमी, सातार्यात 85.1 मीमी, रत्नागिरीमध्ये 122.9 मीमी, कोल्हापुरात 130.4मीमी, महाबळेश्वर मध्ये 131.9 मीमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान मुंबईत कुलाबामध्ये 115.8 मीमी, सांताक्रुझमध्ये 86.5 मीमी तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या अंतर्गत भागात 100-120 मीमी पावसाची नोंद झाली आहे.