Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, पश्चिम किनारपट्टीवर वेगवान वारे, हवामान विभागाचा पुन्हा इशारा

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील. त्यासोबतच बंगालच्या उपसागरातही कमी दापाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या 24 तासात हे क्षेत्र अधिक तीव्र आणि परिणामकारक ठरेल. या सर्वाची परिणीती राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्यात होईल

Weather | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील शेतकरी (Farmers in Maharashtra) , शेतीशी संबंधीत व्यावसायिक आणि नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Departmen) अंदाज वर्तवला आहे की, राज्यात पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Maharashtra Weather Forecast) पडू शकतो. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील. त्यासोबतच बंगालच्या उपसागरातही कमी दापाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या 24 तासात हे क्षेत्र अधिक तीव्र आणि परिणामकारक ठरेल. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर वेगवान वारे वाहू लागेल. या सर्वाची परिणीती राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्यात होईल, असा अंदाज आयएमडी (IMD) म्हणजेच भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे माहिती देताना म्हटले आहे.

12 सप्टेंबर: यलो आणि ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघर

यलो अलर्ट: ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया

13 सप्टेंबर: यलो आणि ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर

यलो अलर्ट: मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली (हेही वाचा, देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या नव्या ठिकाणाची नोंद; महाबळेश्वर, ताम्हिणी येथे चेरापुंजीपेक्षाही अधिक पर्जनवृष्टीची नोंद)

14 सप्टेंबर: यलो आणि ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूर

यलो अलर्ट: मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती

15 सप्टेंबर: आणि ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

ऑरेंज अलर्ट: पालघर

यलो अलर्ट: त्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, पुणे

ट्विट

दरम्यान, हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे माहिती देताना म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले (WML). येत्या 24 तासात ते आणखी तीव्र (Depression) होण्याची शक्यता IMD ने वर्तवली,तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता.परीणामी पश्र्चिम किनारपट्टीवर पुढचे ३,४दिवस वारे जोरदार असतील,राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.