SW Monsoon Withdrawal 2022: मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण; पहा हवामान अंदाज

यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं परिणामी मान्सूनच्या प्रवासावर त्याचा परिणाम झाला आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आयएमडी (IMD) कडून तसा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी (SW Monsoon Withdrawal) आवश्यक असलेली स्थिती वायव्य भारतात तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. अँटी सायक्लोन परिस्थितीमुळे पुढील 5 दिवस पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली मधील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

पावसाच्या परतीच्या प्रवासाची चिन्हं असताना बंगालच्या उपसागरामध्ये 20 सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने महाराष्ट्रात मात्र पाऊस कायम राहणार आहे. विदर्भात 20, 21 सप्टेंबरला पावसाचा अंदाज आहे. तर 22 सप्टेंबरला घाट परिसरामध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान अंदाज

यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं परिणामी मान्सूनच्या प्रवासावर त्याचा परिणाम झाला आहे. मागील वर्षी मान्सूनने भारतात उशीरा माघार घेतली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. 22 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली होती.