महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 News18-Ipsos Exit Polls Results: महाराष्ट्रामध्ये शिवसेना - भाजपा महायुती ऐतिहासिक विजय मिळवण्याची शक्यता

यामध्ये भाजपा- युतीला सर्वाधिक म्हणजे 243 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Vidhan Sabha Election Exit Poll 2019 (Photo Credits: File)

Maharashtra Assembly Elections 2019 Exit Poll  Results:  महाराष्ट्रामध्ये आज (21 ऑक्टोबर) 288 विधानसभा जागांवर मतदान पार पडले आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजता संपल्यानंतर आता महराष्ट्रातील मतदारांचे कल आणि कौल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. News18-Ipsos च्या एक्झिट पोलनुसार, सत्तेच्या चाव्या पुन्हा भाजपा- शिवसेना युतीच्या हातामध्ये पडण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपा- युतीला सर्वाधिक म्हणजे 243 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज पार पडलेल्या मतदानानंतर आता अनेक वृत्त वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये India Today - Axis My India, ABP Majha- CVoters आणि TV9 - Cicero सोबत आपले कौल जाहीर करत आहेत. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल 24 ऑक्टोबर दिवशी जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे हे एक्झिट पोल अंदाज खरे ठरतात का? हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा News18-Ipsos चा एक्झिट पोल काय सांगतोय?

भाजपा - शिवसेना युती : 243

एमआयएम: 1

कॉंग्रेस राष्ट्रवादी : 41

इतर: 03

उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयाची पतका फडकावणार आहे. महायुती (भाजप-शिवसेना)- 31, भाजप-18, शिवसेना-13, काँग्रेस-5 आणि राष्ट्रवादी- 1 जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भामध्येही पुन्हा भाजप  वर्चस्व मिळवणार आहे.

2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी लागणार आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 145 चा जादूई आकडा कोण आणि कसं गाठतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.