Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: अमोल खताळ ते स्नेहा पंडित दुबे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये जायंट किलर पहा कोण कोण ठरले

यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Elections | File Image

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) महायुतीला (Mahayuti) दणदणीत विजय मिळाला आहे. या विधानसभा निवडणूकीमध्ये अनेक मातब्बर नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरूद्ध महायुती च्या लढ्यात महायुतीला राज्यात सर्वदूर यश मिळाले आहे. महायुती समोर मविआ ला माफक यश मिळाले असल्याने विधिमंडळामध्ये विरोधीपक्ष नेता नसणार आहे. त्यामुळे या निवडणूकांमध्ये महायुतीला असं एकतर्फी यश देण्यासाठी नेमके जायंट किलर कोण ठरलं? हे देखील जाणून घ्या. नक्की वाचा: Reasons of Victory of The Maha Yuti: महायुतीच्या विजयाची कारणे कोणती? उदासीन मतदार, भ्रामक प्रचार? 

बाळासाहेब थोरात विरूद्ध अमोल खताळ

सलग 8 टर्म आमदार राहिलेले आणि 15 वर्ष मंत्रीपदाचा अनुभव असणार्‍या बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मध्ये पराभव झाला आहे. भाजपाच्या खताळ यांनी यश मिळाले आहे.

पृथ्वीराज चव्हाण विरूद्ध अतुल भोसले

कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव भाजपाच्या अतुल भोसले यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.

हितेंद्र ठाकूर विरूद्ध स्नेहा पंडित दुबे

वसई विधानसभा मतदारसंघामध्ये सहा वेळेस आमदार राहिलेले हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजपाच्या स्नेहा पंडित दुबे यांनी त्यांचा पराभव केला आहे.

वरूण सरदेसाई विरूद्ध झिशान सिद्दीकी

वांद्रे पूर्व मध्ये झीशान सिद्दीकी विरूद्ध वरूण सरदेसाई ही तरूण उमेदवारांमध्ये लढाई झाली. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर त्यांना सहानुभूती मिळेल अशी आशा होती तर मनसेने आयत्या वेळेस तृप्ती सावंतांना उमेदवारी दिली होती पण दोन्ही आव्हानांचा सामना करून विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी यांचा वरूण सरदेसाई यांना पराभव केला आहे.

नवाब मलिक विरूद्ध  अबु आझमी 

मानखुर्द शिवाजी नगर  मध्ये माजी मंत्री नवाब मलिक यांचा पराभव झाला आहे. समाजवादी पार्टीच्या अबु आझमी यांनी त्यांचा पराभव केला आहे.

यशोमती ठाकूर विरूद्ध राजेश वानखेडे

कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा राजेश वानखेडे यांनी पराभव केला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री ठाकूर यांचा पराभव कॉग्रेसच्या जिव्हारी लागणारा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif