Maharashtra vidhan Sabha Election 2024: कोकणात राणे बंधू विजयाच्या दिशेने; निलेश राणेंना तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधू प्रतिष्ठेची निवडणूक लधवत आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांचे दोन्ही मुलं यंदा आपलं राजकीय भवितव्य पणाला लावून निवडणुकीच्या मैदानात होते. कोकणतील ह्या दोन्ही राणे बंधुसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे.
Maharashtra vidhan Sabha Election 2024: राज्यातील 288 विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha) काका-पुतणे, बाप-लेक, बंधू-बंधू अशी लढत सुरू आहे. कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार नशिब आजमावत आहेत. 2019 मध्ये रोहित पवार यांनी पहिली आमदारकी लढवली होती. मुंबईत ठाकरे बंधू आणि कोकणात राणे (Nitesh Rane) बंधू प्रतिष्ठेची निवडणूक लधवत आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांचे दोन्ही मुलं यंदा आपलं राजकीय भवितव्य पणाला लावून निवडणुकीच्या मैदानात होते. कोकणतील ह्या दोन्ही राणे बंधुसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. कोकणात आमदार नितेश राणे आणि निलेश राणे (Nilesh Rane) दोघेही निवडणुकीच्या रणांगणात आहेत. दोन्ही राणे बंधुंचा विजय झाल्याची माहिती मिळत आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातून वैभव नाईक यांचा पराभव झाला आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024: सांगोल्यात शहाजीबापू पाटलांना धक्का? बाबासाहेब देशमुख आघाडीवर)
कोकणातील या दोन नेत्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवार दिली आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर यांना तिकीट दिलं आहे. दोघांमध्ये काँट की टक्कर पाहायला मिळाली. सकाळपासूनच येथील मतदारसंघातील निकालावर नजरा खिळून होत्या. अखेर, नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांचाही विजय झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे निलेश राणे यांनी निवडणुकांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन निवडणूक लढवली होती.
अखेर, त्यांनाही येथील मतदारसंघात यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांना तब्बल 53 हजार मतांचं मताधिक्य मिळालं आहे. 53,893 मतांनी नितेश राणे विजयी झाल्याने त्यांचा हा मोठा विजय आहे. तर, कुडाळमध्ये नितेश राणे यांना पहिल्या 18 फेरीत 6600 मतांचे मताधिक्य होते. त्यामुळे, त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

