IPL Auction 2025 Live

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून 38 उमेदवारांची पहिली यादी; अजित पवार बारामती मधून रिंगणात

अजित पवार पुन्हा विधानसभा निवडणूकीसाठी बारामती मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Ajit Pawar | (Photo Credit - X)

NCP Candidate List 2024 Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) यंदा राज्यात मोठा राजकीय संघर्ष होणार आहे. त्यामध्ये आज एनसीपी (NCP) कडून 38 उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे. या यादीमध्ये अजित पवारांसह त्यांच्या शिलेदारांची नावं पहायला मिळत आहेत. लोकसभेच्या अनुभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) बारामती (Baramati) सोडून इतर विधानसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमवणार किंवा लेकाला बारामतीमध्ये उभं करणार अशी चर्चा होती पण आजच्या यादीत अजित पवार स्वतः बारामतीमधून लढणार असल्याचं जाहीर झालं आहे. त्यासोबतक अदिती तटकरे श्रीवर्धन, छ्गन भुजबळ येवला तर कागल मधून हसन मुश्रीफ निवडणूकीच्या रिंगणात आहेत. अद्याप अनेक महत्त्वाच्या नावांचा आणि जागांचा पहिल्या यादीत समावेश नसल्याने महायुतीच्या आगामी याद्यांकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

एनसीपी मध्ये काल दाखल झालेल्या राजकुमार बडोले यांना आज अर्जुनी मोरगाव मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. सोबतच हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके या कॉंग्रेस मधून एनसीपीत आलेल्यांनाही एनसीपी कडून विधानसभेसाठी तिकीट जाहीर झाले आहे. Maharashtra Assembly Elections 2024: एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर; अमित ठाकरे विरूद्ध माहिम मध्ये सदा सरवणकरांना तिकीट; पहा 45 उमेदवारांची संपूर्ण यादी. 

बारामती मधून पुन्हा अजित पवार रिंगणात

अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई

शरद पवार यांच्यापासून वेगळे होत महायुतीमध्ये दाखल झालेल्या अजित पवारांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अनेक पातळींवर प्रतिष्ठेची आहे. 2019च्या विधानसभा निवडणूकीमध्ये अजित पवार 165265 इतक्या विक्रमी मतांनी निवडून आले होते, त्यांनी भाजपाच्या गोपिचंद पडळकर यांचा पराभव केला होता.  त्यावेळी सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. आता 8व्यांदा अजित पवार विधानसभेची

महाराष्ट्रामध्ये यंदा 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.