Voting Disrupted in Washim: वाशिममधील मतदान केंद्र 250 वर तासभरापासून मतदान विस्कळीत, नागरिकांचा खोळंबा (Watch Video)
मतदानाला सुरूवात होताच पुणे,कोल्हापूरमधील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक भलतेच संतापले आहेत.
Voting Disrupted in Washim: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी आज राज्यभरात उत्साहात मतदान सुरू (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजता मतदान संपेल. पण मतदानाला सुरूवात होताच पुणे,कोल्हापूरमधील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड (EVM Machine)झाल्याचे समोर आले. आता त्यानंतर वाशिममधूनही अशीच परिस्थीती समोर आली आहे. वाशिममधील (Washim) मतदान केंद्र 250 वर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला. परिणामी तासभरापासून मतदान थांबले होते. निवडणूक आयोगाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असल्याने नागरिक संतापले आहे. (EVM Machine Down in Pune, Kolhapur: पुणे, कोल्हापूरमध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, नागरिकंचा संताप अनावर (Watch Video))
वाशिममध्ये मतदान विस्कळीत
Maharashtra: Voting was disrupted at Booth 250 in Rithad, Washim, due to an EVM malfunction. The machine failed at 9:20 AM and remains unresolved pic.twitter.com/oT7YMXIlwZ
— IANS (@ians_india) November 20, 2024
पुण्यातील कोथरूड येथील अण्णा साहेब शाळेतील (Anna Saheb School) मशिनमध्ये बिघाड झाला बिघाड झाला होता. कामगार वर्गातील महिलांनी ईव्हीएम मशिनमधील बिघाडावर आक्षेप घेत संताप व्यक्त केला होता. तर कोल्हापूरमध्ये विक्रम हायस्कूलमधील (Vikram High School) मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला. सकाळी लवकर मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा त्यामुळे खोळंबा झाला. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या या कामचूकारपणावर संताप व्यक्त केला आहे.
कोल्हापूरमधील मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड
दरम्यान राज्यातील सर्व नागरिकांना पंतप्रधान मोदी यांनी मतदार करण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्यांच्या अधिकृत खात्याद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले. "आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी मतदान केले जाईल. मी राज्यातील मतदारांना सहभागी होण्याचे आवाहन करतो. पूर्ण उत्साहात आणि लोकशाहीच्या या सणाची शोभा वाढवा, या निमित्ताने मी सर्व तरुण आणि महिला मतदारांना मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट केले.