Maharashtra Vidhan Parishad: महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदासाठी आज होणार भाजप - शिवसेना उमेदवारांंमध्ये थेट लढत
यासाठी शिवसेना विरुद्ध भाजप (BJP) असा थेट सामना रंंगणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे (Maharashtra Vidhanparishad) कामकाज काल सुरु झाले असुन आज विधानपरिषद उपसभापती (Deputy Speaker) पदासाठी सभागृहातच निवडणुक घेतली जाणार आहे. यासाठी शिवसेना विरुद्ध भाजप (BJP) असा थेट सामना रंंगणार आहे. शिवसेने (Shivsena) कडुन या पदासाठी नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांंनी उमेदवारी दाखल केली असुन भाजपने भाई गिरकर (Bhai Girkar) यांंना लढतीसाठी मैदानात उतरवले आहे. आज सुरुवातीला दोन्ही पक्षांंना उमेदवारी मागे घेण्यासाठी वेळ दिला जाईल, मात्र कोणीही माघार न घेतल्यास सभागृहात उपस्थित सदस्यांंकडुन यासाठी मतदान केले जाईल. सध्या महाराष्ट्रात विधानसभा पावसाळी अधिवेशन सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंंदा केवळ दोन दिवसांंचे अधिवेशन घेतले जाणार आहे.
दुसरीकडे भाजप ने सुद्धा विधानपरिषद उपसभापती पद आपल्याकडे घेण्यासाठी कंंबर कसली आहे. वास्तविक कोरोना प्रादुर्भावामुळे उपसभापती पदाची निवडणूक घेऊ नये अशी विनंती भाजपने केली होती. कोरोनामुळे अनेक आमदार अनुपस्थित आहेत अशावेळी एकतर्फी लढत होण्याची शक्यता अधिक असुन ही लोकशाहीची गळचेपी आहे असेही मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंनी मांंडले होते मात्र तरीही आजच विधान परिषद उपसभापती निवडणुक घेतली जाणार हे निश्चित आहे.
दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता, महाराष्ट्र विधानपरिषदेत 78 पैकी 18 जागा रिकाम्या आहेत. तर 60 जागांंपैकी 22 आमदार भाजपचे आहेत. अन्य आमदारांंमध्ये शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 9, काँग्रेस 8 असे संंख्याबळ आहे. एकट्या भाजपचे सर्वाधिक आमदार असुनही महाविकासआघाडीमुळे शिवसेना सध्या मताधिक्याने विजयी होईल असे अंंदाज आहे.