Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! 5 पैकी कोणत्या टप्प्यात काय सुरु काय बंद? घ्या जाणून

महाराष्ट्र पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होत असताना टप्पानिहाय काही निर्बंद कायम आहेत. तर काही टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काही सेवा सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर काहीसेवा बंदच राहणार आहेत. त्यामुळे अनेकांना काय सुरु आणि काय बंद याबाबत निश्चित माहिती नसण्याची शक्यता आहे. म्हणूनच जाणून घ्या महाराष्ट्र अनलॉक होताना पाच टप्प्यांमध्ये काय राहणार सुरु काय असणार बंद.

Maharashtra Unlock | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्य सरकारने 4 जूनच्या मध्यरात्री आदेश जारी केले आणि महाराष्ट्र अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम एकदाचा संपला. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) हटवला जाणार आहे. महाराष्ट्र पाच टप्प्यांमध्ये अनलॉक (Maharashtra Unlock in 5 phases) होत असताना टप्पानिहाय काही निर्बंद कायम आहेत. तर काही टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काही सेवा सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर काहीसेवा बंदच राहणार आहेत. त्यामुळे अनेकांना काय सुरु आणि काय बंद याबाबत निश्चित माहिती नसण्याची शक्यता आहे. म्हणूनच जाणून घ्या महाराष्ट्र अनलॉक होताना पाच टप्प्यांमध्ये काय राहणार सुरु काय असणार बंद.

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, गोंदिया जळगाव, परभणी,ठाणे,वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरु हारणाऱ्या बाबी खालील प्रमाणे. (हेही वाचा, Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! राज्य सरकारकडून आदेश मध्यरात्री जारी, टप्प्यांमध्ये हटणार लॉकडाऊन)

  • रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक
  • सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू
  • थिएटर सुरू, चित्रपट शुटिंगला परवानगी,ई कॉमर्सही सुरू
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट
  • जमावबंदी राहणार नाही
  • जिम, सलून,बस 100% क्षमतेने सुरु
  • इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध
  • आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल

दुसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरु हारणाऱ्या बाबी खालील प्रमाणे.

  • हॉटेल्स, मॉल, चित्रपट गृह 50% क्षमतेने सुरु
  • लोकल सुरु असणार नाही
  • सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी
  • शासकीय आणि खासगी सगळी कार्यालय खुली
  • सायंकाळ सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु
  • चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग सुरु
  • सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50% क्षमेतेने सुरु
  • लग्न सोहळा मंगल कार्यालयात 50% आणि जास्तीत 100 लोकांना उपस्थितीस परवानगी
  • अंत्यविधी सोहळ्याला सगळ्यांना उपस्थितीस परवानगी
  • मिटींग आणि निवडणूक हे कार्यक्रम 50% उपस्थितीत करण्यात येतील.
  • बांधकाम, कृषी कामे, ऑनलाईन , ई-कॉमर्स सुरु
  • जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा 50% क्षमेतेने सुरू
  • शासकीय बस आसाम 100% टक्के सुरू
  • जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास आवश्यक

टप्पा तीन

तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरु हारणाऱ्या बाबी खालील प्रमाणे.

  • अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 कालावधीत सुरु
  • मॉल्स,थिएटर्स सर्व बंद राहतील
  • सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 पर्यंत हॉटेल्स 50% सुरु राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था सुरु (ही सुविधा शनिवार रविवार बंद)
  • लोकल,रेल्वे बंद, मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 याकाळात सुरु
  • 50% क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
  • आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु
  • स्टुडियोत चित्रीकरणास सोमवार ते शनिवार परवानगी, मनोरंजन कार्यक्रम 50% दुपारी 2 पर्यंत खुले (सोमवार ते शुक्रवार)
  • लग्नसोहळे 50% क्षमतेने सुरु तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा
  • बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा
  • शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल
  • जमावबंदी आणि संचारबंदी कायम

चौथा टप्पा

चौथ्या टप्प्यात पुणे, रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरु हारणाऱ्या बाबी खालील प्रमाणे.

  • अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु
  • सरकारी खासगी कार्यालयात 25 % उपस्थितीसह कामकाज शक्य
  • क्रीडा, मैदानांवर सकाळी 5 ते 9 पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु ठेवता येतील
  • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही
  • लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येऊ शकते.
  • अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकतील
  • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करु शकतील.
  • शेतीची कामं 2 वाजेपर्यंत करता येतील.
  • ई कॉमर्स केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु
  • संचार बंदी लागू असणार
  • सलून, जिम 50% क्षमतेने सुरु
  • बसेस 50% क्षमतेने सुरु राहतील.
  • बसमध्ये प्रवाशांना उभं राहता येणार नाही.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी अद्यापही लसीकरण मोहिमेला म्हणावा तसा वेग आला नाही. त्यामुळे धोका अद्यापही कायम आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement