Maharashtra Unlock 4: राज्यात ई-पास रद्द,राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्यास मुभा, Railway Ticket Booking 2 सप्टेंबरपासून सुरु

त्यानुसार अनलॉक 04 घोषीत झाला. राज्य ससरकारच्या नव्या नियमांनुसार राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची घोषणा केली.

Railway Travel | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

लॉकडाऊन (Lockdown) नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर महाराष्ट्र आणि संपूर्ण देश हळूहळू पुन्हा एकदा नवी सुरुवात करत आहे. अनलॉकच्या चौथ्या (Maharashtra Unlock 4) टप्प्यात सरकारने राज्यांमधील आंतरजिल्हा प्रवासास (Inter-State Travel) असलेली ईपास-सक्ती रद्द (E-Passes Not Required In Maharashtra) केली. त्याच्याही एक पाऊल पुढे टाकत रेल्वेनेही राज्यांतर्गत वाहतूक करण्यास मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, राज्यांतर्गत प्रवासासाठी उद्यापासून म्हणजेच 2 सप्टेंबर 2020 पासून रेल्वे बुकींग (Railway Ticket Booking ) सुरु होत आहे. मध्य रेल्वेने तसे जाहीर केले आहे. तसेच, त्याबाबत माहिती देणारे एक पत्रकही जारी केले आहे.

रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांकडून केले जाणारे बुकींग हे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम पद्धतीने होणार आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजे आरक्षण पद्धतीने. येत्या 2 सप्टेंबरपासून हे रेल्वे तिकीट बुकींग सुरु होणार आहे.

मार्च महिन्यापासून देशभरा कोरोना व्हायरस प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान राज्यांतर्गत आणि जिल्हांतर्गत प्रवास करण्यासही प्रतिबंध लावण्यात आले. राज्यांतर्गत प्रवास करायचा असेल तर ई-पास घेणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासांवर मर्यादा आल्या. (हेही वाचा, Maharashtra Unlock 4 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचना; वाहनांना ई-पासची आवश्यकता नाही, हॉटेल आणि लॉज 100% क्षमतेने सुरु)

Central Railway

दरम्यान, मुंबई लोकलबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. मात्र, मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार आंतरजिल्हा प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने मेट्रो सेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतू राज्यात मात्र पुढचा एक महिना मेट्रो सेवा बंदच राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा तसेच नागपूरमधील मेट्रो सेवा सुरू होण्यास नागरिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशावरुन सोमवारी नवी मार्गदर्श तत्व जारी करत लॉकडाऊन नियमांना शिथिलता दिली. त्यानुसार अनलॉक 04 घोषीत झाला. राज्य ससरकारच्या नव्या नियमांनुसार राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची घोषणा केली. नवी मार्गदर्शक तत्व उद्या म्हणजेच 2 सप्टेंबपासून लागू होत आहे. नव्या तत्वांनुसार सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. तसेच ई-पासची सक्ती काढून टाकल्यामुळे नागरिकांना मनासारखा प्रवास करता येणार आहे.