Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्रात तलाठी पदांच्या 4644 जागांवर होणार भरती; 17 जुलै पर्यंत mahabhumi.gov.in वर करा अर्ज

200 मार्कांच्या ऑनलाईन परीक्षेनंतर तलाठी परीक्षेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्र राज्य सरकार कडून महसुल आणि वन विभाग अंतर्गत तलाठी पदासाठीच्या (Maharashtra Talathi Bharti) तब्बल 4644 जागांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. 26 जून पासून त्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून 17 जुलै पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा आहे. तलाठी (क गट) याकरिता उमेदवारांना एक परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचे आयोजन 36 केंद्रांवर करण्यात येणार आहे. दरम्यान ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. अद्याप परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही परंतू अ‍ॅडमीट कार्ड्स आणि परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. पण त्यादृष्टीने आता परीक्षेची तयारी उमेदवारांनी सुरू केली आहे.

तलाठी पदासाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. mahabhumi.gov.in वर उमेदवार आपला अर्ज दाखल करू शकणार आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संबंधित पदांनुसार शैक्षणिक अर्हता आहे. यामध्ये किमान 12वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. आरक्षणानुसार वयाच्या अटीमध्ये शिथिलता देखील लागू असणार आहे.

दरम्यान यशस्वी उमेदवारांना तलाठी पदावर 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे. तलाठी पदासाठी उमेदवारांना 45% गुणांची आवश्यकता आहे. तसेच अर्जासोबत 1000 रूपये प्रवेश शुल्क देखील आकारले जाणार आहे. इथे पहा सविस्तर नोटिफिकेशन.

(हे देखील नक्की वाचा: SSC Tentative Calendar Of Examination 2023 - 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशनचं संभाव्य वेळापत्रक जारी).

मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी 50 गुण, अशी एकूण 200 मार्कांची परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज सादर करतानाच उमेदवारांना आपलं परीक्षा केंद्र देखील निवडण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये नंतर बदल करता येणार नाही. त्यामुळे त्याची निवड देखील काळजीपूर्वक करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 17 जुलै हीच फॉर्म आणि परीक्षा फी भरण्याची देखील अंतिम मुदत असणार आहे.