Maharashtra Swearing-in Ceremony: महायुती कडून सत्तास्थापनेचा दावा; देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सहभागी होणार का? संभ्रम कायम
तसेच उपमुख्यमंत्री पदी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये महायुतीने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आता राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. उद्या 5 डिसेंबर दिवशी आझाद मैदानावर महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजित पवार शपथ घेणार आहेत. मात्र या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार का? याचा संभ्रम अद्याप कायम आहे. मीडीयाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी येत्या काही तासांत निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणती जबाबदारी स्वीकारणार? याबाबतचा सस्पेस अजूनही कायम आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत आग्रह केला आहे. काल 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदे-फडणवीस यांची भेट झाली आहे. यावेळी आपल्यात बोलणं झालं आहे आणि एकनाथ शिंदे सकारात्मक प्रतिक्रिया देतील अशी आशा फडणवीसांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनीही आपला अजून निर्णय झालेला नाही. संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची आमंत्रण पत्रिका सोशल मीडीयामध्ये वायरल; Devendra Fadnavis यांच्या नावात पहिल्यांदाच आईच्या नावाचा उल्लेख.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेत भाजपा सोबत शिवसेना, एनसीपी सह अन्य छोटे पक्ष आहेत. असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी आपण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचंही म्हटलं आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडेच सार्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
अजित पवारांच्य वक्तव्याने पिकला हशा
मीडीया रिपोर्ट्सनुसार, एकनाथ शिंदेंनी भाजपा कडे गृह खात्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला होता आणि महायुती मध्ये अमित शाह, नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्या हातात काय येणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपाने राज्यात सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेकडे 57 आणि एनसीपी कडे 41 जागा आहेत.