Maharashtra Swadhar Yojana: विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना, वार्षिक 51 हजार रुपये मिळणार लाभ; घ्या जाणून
या योजनेच्या माध्यमातून गरीब, अनुसूचित जाति,नव बौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी आणि 12 सोबतच डिप्लोमा प्रोफेशनल - नॉन प्रोफेशनल मध्ये शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने राज्यातील शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वाधार योजना (Swadhar Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब, अनुसूचित जाति,नव बौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी आणि 12 सोबतच डिप्लोमा प्रोफेशनल - नॉन प्रोफेशनल (Diploma Professional - Non Professional) मध्ये शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. सरकारची हीयोजना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे आणि त्यांचे भविष्य अधिक सुरक्षीत करणे या हेतूने सुरु करण्यात आली आहे. आपण किंवा आपल्या माहितील विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी जाणून घ्या स्वाधार योजनेच्या अटी, नियम आणि पात्रता.
स्वाधार योजनेचा लाभ प्रामुख्याने अनुसूचित जाति (SC ), नव बौद्ध समुदाय (NB Category) वर्गातील विद्यार्थ्यांना होईल. ज्यामुळे विद्यार्थी विद्यार्थींना डिप्लोमा प्रोफेशनल - नॉन प्रोफेशनल (Diploma Professional - Non Professional) मध्ये राहणे, खाणे आणि इतर खर्चासाठी सरकारी तिजोरीतून मदत मिळेल. मदतीची ही रक्कम 51,000 इतकी आहे. SC ,NP वर्गातील सर्व विद्यार्थीय या योजनेसाठी पात्र राहतील. (हेही वाचा, BARC Job Recruitment: भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र आणि भाभा अणू संशोधन केंद्रात नोकरीची संधी)
महाराष्ट्र स्वाधार योजना 2022
लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असता कामा नये. विद्यार्थी इयत्ता 10वी, 12 वी, नंतर पुढील जे कोणतेही शिक्षण घेईल त्याचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. विद्यार्थ्यी या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 60% पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असायला हवा. याशिाय विद्यार्थी जर शारीरिक विकलांग, दिव्यांग असेल तर ही अट शिथील करुन 40% इतकी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा.
आवश्यक कागदपत्रे
स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थाकडे स्वत:चे आधार कार्ड, ओळखपत्र, बँकेचे खाते, ऊत्पन्नाचा दाखला, आवश्यक आहे.
कसा कराल अर्ज: स्वाधार योजनेसाठी अर्ज करणयासाठी महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. त्यासाठी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक माहिती मिळवा.