MSRTC शिवशाही बस अपघात, 1 ठार, 11 जखमी; सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथील घटना

दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने शिवशाही बस पुढे चालत असलेल्या ट्रकवर पाठीमागून आदळली. या घटनेत मल्लिकार्जून आबुसे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, बसचे पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये एकूण 16 प्रवासी होते.

Maharashtra State Transport Corporation Shivshahi Bus | (Photo Credits: MSRTC)

Shivshahi Bus Accident in Solapur District: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Transport Corporation) सेवेच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार तर, 11 जण जखमी झाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मल्लिकार्जून आबुसे असून, ते माजी सैनिक असल्याचे समजते. ही घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेटफळ (Shetphal) फाटा येथे शुक्रवारी (30 ऑगस्ट 2019) पहाटे चारच्या सुमारास घडली. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, एम एच 47 वाय 2050 या क्रमांकाची शिवशाही बस पुण्याहून सोलापूरकडे निघाली होती. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने शिवशाही बस पुढे चालत असलेल्या ट्रकवर पाठीमागून आदळली. या घटनेत मल्लिकार्जून आबुसे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, बसचे पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये एकूण 16 प्रवासी होते. (हेही वाचा, व्हिडिओ: शिवशाही बस जागेवरच पेटली, आलीशान गाडी जळून खाक)

दरम्यान, एसटी महामंडळाने तातडीने हालचाल करत जखमींना प्रत्येकी एक तर मयत मल्लिकार्जून आंबुसे यांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा तात्पुरत्या स्वरुपात केली आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. तसेच, काही काळासाठी वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, ट्रॅफीक पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवत वाहतूक पूर्ववत केली. अपघातात झालेल्या घटनास्थळाला सोलापूर ग्रामीण पोलीस आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.



संबंधित बातम्या