Dr. Payal Tadvi Suicide Case: डॉ. चिंग लिंग आणि डॉ. शिरोडकर यांना क्लीन चिट

चिंग लिंग आणि डॉ. शिरोडकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पायलने आपल्यावर होत असलेल्या रॅगिंगबद्दल आपले वरिष्ठ चिंग लिंग आणि शिरोडकर यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, डॉ. लिंग आणि शिरोडकर यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे या दोघांची चौकशी सुरु होती. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने डॉ. लिंग आणि शिरोडकर यांना याप्रकरणी क्लीन चिट दिली आहे.

Payal Tadvi (Photo Credits: Facebook)

Dr. Payal Tadavi Suicide Case: मुंबईच्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्टर पायल तडवीच्या (Dr. Payal Tadavi) आत्महत्या प्रकरणातून डॉ. चिंग लिंग (Dr. Ching Ling) आणि डॉ. शिरोडकर (Dr Shirodkar) यांना क्लीन चिट (Clean Chit) देण्यात आली आहे. पायलने आपल्यावर होत असलेल्या रॅगिंगबद्दल आपले वरिष्ठ चिंग लिंग आणि शिरोडकर यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, डॉ. लिंग आणि शिरोडकर यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे या दोघांची चौकशी सुरु होती.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने डॉ. लिंग आणि शिरोडकर यांना याप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने 22 मे रोजी रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहरे या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून पायची रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप पायलच्या कुटुंबियांनी केला होता. (हेही वाचा - Dr. Payal Tadvi Death Case:पायल तडवी कथित आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी सिनियर डॉक्टर्सचा जामीन फेटाळला)

पायलच्या आत्महत्या प्रकरणी नायर रुग्णालयातील संबधित वैद्यकीय कर्मचारी, तज्ज्ञ तसेच विभागप्रमुख, अधिष्ठाता यांची चौकशी करण्यात आली होती.