SSC, HSC 2019 Result Date: दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांचा निकाल 10 जून पूर्वी maharesults.nic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लागणार - MSBSHSE ची माहिती
शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी मे 2019 चा अंतिम आठवडा किंवा जूनच्या 10 तारखेपूर्वी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावू असे सांगितले आहे.
10th and 12th Board Results 2019: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि बारावी परीक्षा मार्च महिन्यात संपल्या. आता विद्यार्थ्यांना निकालाचे (Exam Results) वेध लागले आहेत. यंदा दहावी बारावीचे निकाल 10 जून पूर्वी लावले जातील असे सांगण्यात आले आहे. SSC, HSC बोर्डाच्या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून वगळले; परिपत्रकातून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याने यंदा बोर्डाच्या 10 वी,12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणूकीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात चौथा आणि मतदानाचा अंतिम टप्पा 29 एप्रिल दिवशी आहे. त्यानंतर 23 मे ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान यामुळे दहावी,बारावीचे निकाल उशिराने लागतील आणि अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निर्णय, वेळापत्रक यांचे गणित बिघडेल या भीतीने पालकांनी मंडाळाकडे भीती बोलून दाखवली होती. मात्र मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी मे 2019 चा अंतिम आठवडा किंवा जूनच्या 10 तारखेपूर्वी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावू असे सांगितल्याचे वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिले आहे. Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?
दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल सोशल मीडियात अनेक उलट सुलट चर्चा रंगतात. मात्र आता या सार्यांना पूर्णविराम लागणार आहे. यंदा दहावीचे 17,00,813 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले आहेत. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल maharesults.nic.in, maharashtraeducation.com आणि results.mkcl.org या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे.