जोडाक्षर नको म्हणून 'बालभारती' ने संख्या वाचनाची पद्धतच बदलली; भाषाकार, पालक, शिक्षक झाले अचंबित
मात्र आता नव्या पद्धतीनुसार, नव्वद दोन असा वाचावा असं सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात 17 जून 2019 पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली आहे. यंदा महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता दुसरी आणि अकारावीच्या पुस्तकामध्ये बदल करण्यात आले आहेत. अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यास अद्याप वेळ आहे. मात्र दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदल पाहून अनेकांना धक्का बसला आहे. दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात अंकगणित वाचताना जोडाक्षरं नकोत म्हणून चक्क संख्या वाचनात बदल करण्यात आले आहेत.
92 हा अंक 'ब्याण्ण्व' असा वाचला जात असे. मात्र आता नव्या पद्धतीनुसार, नव्वद दोन असा वाचावा असं सांगण्यात आलं आहे. लहानमुलांना जोडाक्षरं उच्चारताना त्रास होतो असे सांगत ही नवी पद्धती अवलंबल्याचं सांगण्यात आलं आहे. पुस्तकात जुन्या आणि नव्या दोन्ही पद्धती दिल्या आहेत. त्यानुसार, नवी पद्धतही शिक्षकांनी आजमावावी असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र हा प्रकार म्हणजे मराठी भाषेची गळचेपी असल्याचं भीती काही भाषाकारांनी व्यक्त केली आहे. Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा
महाराष्ट्र टाईम्सला राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संख्या वाचनासाठी तीन पद्धती आहेत. विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती पद्धत वापरू शकतात. सर्व प्रादेषिक भाषांमध्येही संख्या वाचन हे इंग्रजीप्रमाणेच असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे हा बदल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.