Maharashtra SSC, HSC Results 2022: 10वी, 12वी चा निकाल 10 जूनपूर्वी लागणार; बोर्डाची माहिती
दरम्यान विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बोर्ड 10 जूनपूर्वी यंदा निकाल लावणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यंदा कोरोना संकटाच्या सावटाखालीच 10वी (SSC Exam), 12वीची बोर्ड परीक्षा (HSC Exam) पार पडत आहे. परीक्षा जशी अंतिम टप्प्यात आली आहे तसे आता विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना यंदाच्या एसएससी, एचएससी निकालाचे वेध लागले आहेत. बारावीचा शेवटचा पेपर 7 एप्रिलला होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बोर्ड 10 जूनपूर्वी यंदा निकाल लावणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ वृत्तपत्रकासोबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे चे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीमध्ये मागीलवर्षी पेक्षा यंदा 10-12 वीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. परीक्षेनंतर 60 दिवसांत म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील. विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षकांची त्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे पेपर न तपासण्याची भूमिका असली तरीही, निकाल वेळेतच जाहीर होतील असे ते म्हणाले. SSC HSC Results Update: 10 वी आणि 12 वीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता? मंडळाने दिले स्पष्टीकरण .
विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्डाचे पेपर तपासण्यास नकार दिल्याने निकाल रखडणार का? अशा चर्चा रंगत आहेत पण बोर्डाने अनुदानित शाळांमधील राखीव शिक्षकांच्या मदतीने पेपर तपासणीचं काम पूर्ण केलं जाईल असं म्हटलं आहे. त्यांना 200-250 पेपर तपासायला दिले जाणार आहेत.
यंदा दहावीच्या 16 लाख 40 लाख तर बारावीच्या 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्यांचे पेपर तपासण्यासाठी अंदाजे 40 हजार शिक्षक काम करणार आहेत.