Maharashtra SSC Result 2023 Date: इयत्ता दहावीचा निकाल होणार लवकरच जाहीर, स्कोअरकार्ड कसे पाहाल? घ्या जाणून

हा निकाल जाहीर झाल्यानंतर तो MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट Mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर पाहायला मिळू शकतो.

Representative Image (Photo Credit- PTI)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाचा SSC परीक्षा 2023 म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल पुढच्या अवघ्या काही दिवसांमध्ये अथवा तासांमध्ये जाहीर होऊ शकतो. हा निकाल जाहीर झाल्यानंतर तो MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट Mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर पाहायला मिळू शकतो. अर्थात शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर होण्याबाबत तारीख, वेळ याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र, हा निकाल जाहीर झाल्यानंतर तो शक्य तितक्या तातडीने कुठे आणि कसा पाहता येईल याबाबतचा आवश्यक तपशील आपण येथे जाणून घेऊ शकता.

कसा पाहाल निकाल?

Digilocker वरही आपण पाहू शकता इयत्ता दहावीचा निकाल, कसा पाहाल?

यावर्षी, महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा 2023 साठी 15,77,256 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. ज्यामध्ये 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींनी परीक्षा दिली. या सर्वच विद्यार्थ्यांना, त्याचे पालक आणि शक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे.