Maharashtra SSC & HSC Results 2020: 10 वी, 12 वीचे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता; mahresult.nic.in वर कसा पाहाल निकाल?

त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जुलै 2020 पर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती देण्यात आली होती.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

10th, 12th Board Results Dates In Maharashtra: कोरोना व्हायरस संकटामुळे यंदा 10 वी-12 वीचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जुलै 2020 पर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती दिली होती. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 12 वीचा निकाल यंदा 15 जुलै पर्यंत तर 10 वीचा निकाल यंदा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केला जाणार आहे. दरम्यान निकालाची अधिकृत तारीख 1-2 दिवस आधीच जाहीर केली जाईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 11 वी ची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांचे ट्रेनिंग देखील सुरु आहे.

महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. तर यंदा 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. 12 वी चे सर्व पेपर्स झाले असले तरी कोरोनाच्या दहशतीमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भूगोलाचे मार्क्स हे इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत.

10 वी, 12 वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

# तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.