Maharashtra Skill Development University: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार

शिंदे सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे.

Ratan Tata (Photo Credits: Getty Images)

Maharashtra Skill Development University: शिंदे सरकार (Shinde Government) ने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळा (Maharashtra Cabinet) ने महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे (Maharashtra Kaushalya Vidyapeeth) नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे नाव देण्यात येणार आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ आता रतन टाटा विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार आहे.

9 ऑक्टोबर रोजी उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आणि संपूर्ण देशाने या मोठ्या हानीवर शोक व्यक्त केला. रतन टाटा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सुधारण्यासाठी आणि भारताला एक नवीन ओळख देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (हेही वाचा -Maharashtra Cabinet Decisions: मुंबई टोल मुक्त ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा; मंत्रिमंडळ बैठकीत आज 19 निर्णय)

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार - 

भारताचे भवितव्य घडवण्यात टाटांच्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने रतन टाटा यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करणारा ठराव मंजूर केला आहे. टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement