Maharashtra Cabinet Decisions: मुंबई टोल मुक्त ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा; मंत्रिमंडळ बैठकीत आज 19 निर्णय
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्रात आगामी विधानसभेसाठी कधीही आचारसंहिता लागू होण्याची चिन्हं असताना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे मुंबई मध्ये पाच टोल नाके हलक्या वाहनांसाठी संपूर्णपणे मुक्त करण्यात आले आहेत. पण यासोबतच साठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. नक्की वाचा: Raj Thackeray On Toll Free Mumbai: 'हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी'; राज ठाकरे यांची टोलमाफीच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातील आजचे निर्णय
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2024 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

