महाराष्ट्र: लॉकडाउनमुळे सिंधुदुर्ग येथे अडकलेल्या परप्रांतीयांची फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी

त्यामुळे नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाउनमुळे राज्यातील विविध भागात मोठ्या संख्येने मजूर आणि कामगार वर्ग अडकून पडले आहेत.

Migrant Labourer (Photo Credits-Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाउनमुळे राज्यातील विविध भागात मोठ्या संख्येने मजूर आणि कामगार वर्ग अडकून पडले आहेत. याच कामगारांना आता त्यांच्या घरी पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आली आहे. तत्पूर्वी कामागरांना स्थानिक राज्य सोडून जाताना त्यांचे रजिस्ट्रेशन आणि वैद्यकिय चाचणी करणे अत्यावश्यक असल्याची सुचना देण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग येथे अडकलेल्या परप्रातीयांना आपल्या राज्यात पाठवण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येत आहे. परंतु रुग्णालयात त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाउनमुळे कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने त्यांचे हातावर पोट आहे. परंतु त्यांना रोजगारची संधी लॉकडाउनमुळे उपलब्ध नसल्याने त्यांनी घरची वाट पकडली होती. काहींनी तर चोरीछुप्या रितीने गाडीतून जाण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. मात्र राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाऊ नये असे आवाहन केले होते. तसेच त्यांच्यासाठी शेल्टर होमसह त्यांच्या खाण्यापिण्याची सोय सुद्धा उपलब्ध करुन दिली आहे. केंद्र सरकारने आता कामगार वर्गाला त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यासाठी परवानगी दिली आहे. पण काही नियम आणि अटी सुद्धा लागू केल्या आहेत. (धक्कादायक! मुंबईतील राजावाडी रुग्णालयात जागेची कमतरता असल्यामुळे 63 वर्षीय COVID-19 पॉझिटिव्ह वृद्ध महिलेला रस्त्यावर काढावी लागली रात्र)

Lockdown 3.0 : कोणत्या भागात काय सुरु आणि काय बंद ? जाणून घ्या सविस्तर - Watch Video

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार केले जात आहेत. त्याचसोबत पोलीस कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावत आहेत. राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून कोरोनाची विविध क्षेत्रातील परिस्थिती पाहता नियम शिथिल करण्यात आले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif