Maharashtra: खरेदीसाठी शॉपिंग मॉलमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांचा विरोध

त्यानुसार उद्यापासून रेस्टॉरंट, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

Malls | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra: राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने राज्य सरकारने उद्यापासून (15 ऑगस्ट) लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून रेस्टॉरंट, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र यासाठी अट सुद्धा लागू करण्यात आली आहे. जर तुम्हाला खरेदी करण्यासाठी शॉपिंग मॉल्स, सेंटर्समध्ये जायचे असेल तर तुमचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याच नियमाला आता दुकान मालकांकडून विरोध केला जात आहे.(Maharashtra Lockdown: महाराष्ट्रातील निर्बंध रविवारपासून शिथिल होणार, काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून)

सामान्य दुकानांना जे नियम लागू करण्यात आले आहेत तेच नियम शॉपिंग मॉल्स, सेंटरसाठी असावेत असे दुकान मालकांनी म्हटले आहे. तर लसीकरणाचा लागू करण्यात आलेला नियम हा रद्द करावा. कारण कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या एका वर्षाहून अधिक काळ बंद असलेला व्यवसाय आता कुठे सुरु होणार याची आशा होती. पण आता लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच शॉपिंग मॉल्समध्ये परवानगी दिली जाणार असल्याने दुकान मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Dharavi Covid-19 Update: धारावीत आज कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही; केवळ 11 सक्रीय रुग्ण)

दरम्यान, राज्यात प्रवेश करण्यासाठी आता एखादा प्रवासी येत असेल तर त्याने कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे असे राज्य सरकारने त्यांच्या आदेशात म्हटले आहे. यासाठी त्यांना लसीकरणाचे सर्टिफिकेट सोबत असणे सुद्धा गरजेचे आहे. मात्र जर लस घेतली नसल्यास आणि निगेटिव्ह आरटी पीसीआर रिपोर्ट्स असतील तर ते रिपोर्ट सुद्धा दाखवणे जरुरी आहे. पण या नियमांचे उल्लंघन केल्यास बाहेरुन आलेल्या प्रवाशांना राज्यात 14 दिवस क्वारंटाइन मध्ये रहावे लागणार आहे.

राज्यात डेल्टा प्लसचे सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्र सरकारने पुष्टी केली आहे की, डेल्टा प्लसच्या वेरियंटमुळे 5 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत डेल्टा प्लस वेरियंट बद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. लसीचा सुद्धा वेरियंटवर किती प्रभाव होतो यावर रिसर्च केला जात आहे. मात्र या परिस्थितीत सावधगिरी बाळगणे सुद्धा गरजेचे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif