Pune: मुख्यध्यापकाचे विद्यार्थीनीसोबत संतापजनक कृत्य, पुण्यातील राजगुरूनगर येथील घटना

अशातच पुण्यातील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार यासह अन्य काही मार्गाने महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन स्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. अशातच पुण्यातील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्यातील (Pune) राजगुरूनगर (Rajgurunagar) येथे एका मुख्यध्यापकाने विद्यार्थीनीसोबत संतापजनक कृत्य केले आहे. पुस्तक देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा आरोपाखाली मुख्यध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला 20 दिवसांहून अधिक दिवस उलटून गेले तरी, मुख्यध्यापकाविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीत शिकत आहे. दरम्यान, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीडित मुलगी तिच्या भावाचे पुस्तके परत देण्यासाठी शाळेत गेली होती. त्यावेळी शाळेच्या मुख्यधापकाने तिला आपल्या कार्यालयात बोलावले. तसेच शाळेत कोणीच नसल्याचे पाहून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. परंतु, बदनामीच्या भितीने पीडिताच्या पालकाने पोलिसांत न जात घडलेला संपूर्ण प्रकार महिला शिक्षिकेच्या कानावर घातला. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली. यासंदर्भात पुढारीने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Two Drowned In Ratnagiri: मित्रांसोबत बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

महत्वाचे म्हणजे, तक्रार दाखल करून अनेक दिवस उलटले तरी, आरोपी मुख्यध्यापकाविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या प्रकरणातील मुख्यध्यापकाविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी अधिक जोर धरला आहे. तसेच परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.