RTE Application Deadline Extended: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 घेण्यास अंतिम मुदतवाढ, जाणून घ्या नवी तारीख

महाराष्ट्र सरकारने खाजगी शाळांसाठी आरटीई प्रवेश अर्जांची अंतिम मुदत 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. पालक student.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

RTE Application Deadline Extended: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 घेण्यास अंतिम मुदतवाढ, जाणून घ्या नवी तारीख
Private School | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र सरकारने शिक्षण हक्क (Maharashtra RTE Admissions) कायद्यांतर्गत खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत (RTE Application Deadline) वाढवली आहे. पालकांना आता शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला, अर्ज करण्याची विंडो 14जानेवारी 2025 रोजी उघडली गेली आणि 27 जानेवारी 2025 रोजी बंद होणार होती. दरम्यान, पालकांच्या अधिक सोयीसाठी, सरकारने ही अंतिम मुदत 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली.

आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यास इच्छुक पालक student.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात.

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 साठी प्रवेश अर्ज कसा कराल?

शिक्षण हक्क कायदा वापरुन मुलांना शालेय प्रवेश कसा मिळवायचा याबाबत आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर इथेच आहे. ज्या पालकांना अशा प्रकारे अर्ज दाखल करायचे आहे त्यांनी खालील पायऱ्या वापरुन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: student.maharashtra.gov.in.
  • होमपेजच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या 'ऑनलाइन अर्ज' पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज आयडी तयार करण्यासाठी 'नवीन नोंदणी' निवडा.
  • तुमचे वापरकर्तानाव, पासवर्ड आणि कॅप्चासह लॉग इन करा.
  • अर्ज भरा, शाळा निवडा आणि सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या फॉर्मची पीडीएफ सेव्ह करा आणि प्रिंट करा.

आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

अनेक पालक अर्ज दाखल करण्यास इच्छुक असले तरी, अद्यापही त्यांना त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात याबाबत माहिती नसते. त्यामुळे अर्ज प्रक्रियेदरम्यान पालकांनी खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे:

  1. मुलाचा जन्म दाखला
  2. पालकांचा उत्पन्नाचा दाखला
  3. पत्त्याचा पुरावा
  4. पालकांचे आधार कार्ड

दरम्यान, शिक्षण हक्क (RTE) उपक्रम मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करतो. हे प्रवेश मिळविण्यासाठी मुदतवाढ देण्यापाठिमागे महाराष्ट्र सरकारच्या या पावलाचा उद्देश अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि पालकांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ देणे हा उद्देश आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).