Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात आज 6 हजार 603 रुग्णांची नोंद, तर 198 जणांचा मृत्यू

तर, 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 2 लाख 23 हजार 724 वर पोहचली आहे. यापैकी 9 हजार 448 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 6 हजार 603 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 2 लाख 23 हजार 724 वर पोहचली आहे. यापैकी 9 हजार 448 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 23 हजार 192 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 7 लाख 42 हजार 417 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 20 हजार 642 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाख 56 हजार  जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- COVID-19 Cases In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढली; गेल्या 48 तासात 278 जणांना कोरोनाचा संसर्ग, एकाचा मृत्यू

एएनआयचे ट्विट-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती, लॉकडाऊन , राज्यासमोर असलेले आर्थिक आव्हान आणि इतरही काही कारणांमुळे राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्यातील जनतेचे लक्ष्य लागले होते. या बैठकीमध्ये शिवभोजन थाळी, रेशन कार्ड, पेयजल योजना आणि इतर विभागातील काही निर्णय घेण्यात आले आहेत.