Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत 405 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, राज्यातील मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर

आज दिवसभरात राज्यात 22,078 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात एकूण 8 लाख 34 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत असून महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, राज्यात मागील 24 तासांत 21,656 नवे रुग्ण आढळले असून 405 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 लाख 67 हजार 496 वर (COVID-19 Cases) पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर (COVID-19 Death Cases) पोहोचला आहे. राज्यात सद्य घडीला 3 लाख 887 रुग्णांवर (COVID-19 Active Cases) उपचार सुरु आहेत.

तर या सोबत दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसोबत बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 22,078 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात एकूण 8 लाख 34 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

हेदेखील वाचा- Sec 144 In Mumbai: मुंबई मध्ये कलम 144 अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत जमावबंंदी कायम राहणार,नवे निर्बंध नाही- मुंंबई पोलिस

तर मुंबईमध्य कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आता मुंबईत (Mumbai) येत्या 30 सप्टेंबर कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने अगोदरच 31 ऑगस्ट पर्यंत जमावबंंदी लागु केली होती ज्यात ही वाढ करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मुंबईत पोलिसांकडून कोणत्याही नव्या नियमांची अमंलबजावणी करण्यात आली नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 52 लाखांच्या पार गेला आहे. दरम्यान आज मागील 24 तासांमध्ये भारतामध्ये 96,424 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 1,174 जणांची कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची लागण झाल्याने कोविड 19 (COVID 19) वर उपचार घेणार्‍यांची संख्या 10,17,754आहे. तर आत्तापर्यंत एकूण 84,372 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरामध्ये एकूण कोरोनाबाधित देशांच्या यादीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे.