Vijay Wadettiwar Passport Confiscated: राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त

विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर असलेले अनेक गुन्हे लपवल्याचा आरोप आहे.

Vijay Wadettiwar | (Photo Credits: Facebook)

राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री ( Maharashtra Relief and Rehabilitation Minister ) आणि काँग्रेस नेते ( Congress Leader) विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा पासपोर्ट जप्त (,Vijay Wadettiwar Passport Confiscated) करण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडीया यांनी केलेल्या तक्रारीवरुन पासपोर्ट विभागाने ही कारवाई केल्याचे समजते. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर असलेले अनेक गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. या संदर्भात माजी आमदार भांगडीया यांनी अनेकादा मुख्यमंत्री कार्यालय ते राज्याचा पोलीस विभाग यांच्यापर्यंत तक्रार दिली. मात्र, तरीही कारवाई न झाल्याने आता त्यांनी पासपोर्ट विभागाकडे तक्रार दिल्याचे समजते. एबीपी माझा या वृत्तावहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

विजय वडेट्टीवार यांनीच स्वत: जाऊन आपला पासपोर्ट जमा केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भांगडीया यांनी पासपोर्ट कार्यालयाकडे तक्रार केली. तरीही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Maharashtra Congress State President: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार स्पर्धा, अशोक चव्हाण, राजीव सातव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत)

विजय वडेट्टीवार यांनी या एकूण प्रकाराबाबत माहिती देताना सांगितले की, पासपोर्टसाठी जेव्हा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली तेव्हा माझ्यावर असलेल्या गुन्ह्यांबाबत मला विसर पडला होता. मला त्याचे स्मरण झाले नाही. त्या वेळी माझ्यावर किरकोळ स्वरुपाचे तीन-ते चार गुन्हे दाखल होते. आज रोजी मात्र आपल्यावर एकही गुन्हा दाखल नाही. आपल्याला आलेल्या नोटीशीनंतर आपण त्याला उत्तर दिल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

पासपोर्ट काढताना पासपोर्ट कार्यालयाला कायम निवासाचा पत्ता द्यावा लागतो. विजय वडेट्टीवार यांनी त्यासाठी मनोरा हा पत्ता दिला होता. तसेच, त्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या पोलिस स्टेशनकडून एनओसी सुद्धा घेतली होती. या एनओसीमध्ये त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नसल्याचे म्हटले होते. यावरुन माजी आमदार भांगडीया यांनी तक्रार केली. दरम्यान, तक्रारीचे निराकरण न झाल्याने भांगडीया यांनी कोर्टाची पायरी चढली. कोर्टाने पोसपोर्ट कार्यालयाला नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.