Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ! 3752 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1,20,504 वर
त्यासोबतच दिलासादायक बातमी म्हणजे आज दिवसभरात 1672 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 60838 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
महाराष्ट्राभोवती कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा हा दिवसेंदिवस आणखीनच आवळला जात असून कोरोना संक्रमितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासांत 3752 रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे. राज्यात आज 100 रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या 5751 वर पोहोचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. त्यासोबतच दिलासादायक बातमी म्हणजे आज दिवसभरात 1672 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 60838 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
महाराष्ट्रात सद्य घडीला 53,901 रुग्ण सक्रिय असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून आज मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात 28 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे. Coronavirus: जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर! आज 135 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
तर भारतामध्ये आज आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत सर्वाधिक कोरोनाबधित रूग्ण आढळले आहे. एका दिवसात 12881 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 334 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतामध्ये आता कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 3 लाख 66 हजार 946 पर्यंत पोहचला आहे. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशात 17 जून पर्यंत 62,49,668 सॅम्पल्स तपासले आहेत. मागील 24 तासामध्ये 1,65,412 सॅम्पल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.