Covid-19 Vaccination in Maharashtra: कोविड-19 लसीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल
मात्र यातच सकारात्मक बातमी समोर येत आहे.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यातच सकारात्मक बातमी समोर येत आहे. कोविड-19 लसीकरणात (Covid-19 Vaccination) महाराष्ट्र (Maharashtra) अव्वल ठरला आहे. केवळ लसींचे सर्वाधिक डोस देण्यात नाही तर लसींचे दोन्ही डोस देऊन नागरिकांना सुरक्षित करण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. आतापर्यंत राज्यात 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 लसींचे डोस देण्यात आले असून त्यापैकी 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशी माहिती अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी दिली आहे. (मुंबई मध्ये लवकरच सोसायट्यांमध्येच थेट मिळणार कोविड 19 ची लस; 'या' असतील अटी!)
विशेष म्हणजेच लसीकरणात प्रथम स्थानी असलेल्या महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण केवळ 1 टक्के इतकेच आहे. त्यामुळे लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी कौतुकही केले आहे. 5 मे पर्यंत राज्यात 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांना लस देण्यात आली असून त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे.
MAHARASHTRA DGIPR Tweet:
महाराष्ट्रानंतर लसीकरणात राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. दरम्यान, कालच्या अपडेटनुसार राज्यात 57,640 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 920 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे काल 57,006 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.