Maharashtra Rajyaseva Pariksha Result: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर निकाल, कट ऑफ लिस्ट

आयोगाने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही लेखी परीक्षा 9 प्रश्नपत्रिकांची आणि 1750 गुणांची आहे. मुलाखतीचे 275 मार्क्स आहेत. एकूण 2025 गुणांची ही परीक्षा आहे.

Result 2024 | file image

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 20, 21 व 22 जानेवारी 2024 दिवशी घेण्यात आलेल्या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आज (16 जुलै) जाहीर करण्यात आला आहे. आज निकालासोबतच आयोगाने कट ऑफ लिस्ट देखील जाहीर केली आहे. एमपीएससी ची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 दिलेल्या विद्यार्थ्यांना mpsc.gov.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

आज जाहीर झालेल्या निकालामध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे आता हे उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे. एमपीएसीचा निकाल 3 टप्प्यांत लावला आहे. आणि अंतिम निकाल हा त्यांची गोळाबेरीज करून जाहीर केला जाईल. त्यानुसार यादी प्रसिद्ध होते.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल कसा पहा

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा   इथे पहा निकालाची डिरेक्ट लिंक!

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 कट ऑफ लिस्ट इथे पहा !  

MPSC ने 2024 साठी नवीन परीक्षा पॅटर्न जाहीर केला आहे. आयोगाने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही लेखी परीक्षा  9 प्रश्नपत्रिकांची आणि 1750 गुणांची आहे. मुलाखतीचे 275 मार्क्स आहेत. एकूण  2025 गुणांची ही परीक्षा आहे. 

.