Maharashtra Rain Update: मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाहा कसे असेल उद्याचे हवामान
उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देण्यात आला आहे. कोकणात (Konkan) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - Nashik Gangapur Dam: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; गोदावरी नदीला पूर आल्याने लहान मंदिरे पाण्याखाली)
उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबारमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरात घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, शहरी भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या उजनी धरणात (Ujani Dam) देखील मोठ्या प्रमाणातक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वीर धरणातून 63 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं भीमा व नीरा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, वीर धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2024 11:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

