Maharashtra Rain Update: मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात दमदार पावसाची शक्यता- हवामान विभाग
त्यामळे या क्षेत्राचे रुपांतर वादळात झाले आहे. परिणामी राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra ), विदर्भ (Vidarbha) मराठवाडा (Marathawada), दक्षिण कोकण (South Konkan) आणि गोवा (Goa), कर्नाटक (Karnataka), आंध्र प्रदेश, तेलंगनासोबतच ओडीशा (Odisha) या राज्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. परिणामी तंलगणा राज्यात अतिमुसळधार (Heavy To Very Heavy Falls) पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलका, मध्यम तरकाही भागांमध्ये मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय , उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी)
हवामान विभाहाने म्हटले आहे की, बंगालच्या उपसारगामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामळे या क्षेत्राचे रुपांतर वादळात झाले आहे. परिणामी राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्जन्यवृष्टीच्या आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण असल्याच्या काळात वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. हे वारे प्रतितास 56 ते 56 किलोमीटर वेगाने वाहू शकेल. हेच वारे पुढे प्रतितास 75 किलोमीटर इतक्या वेगानेही वाहू शकेल. या काळात समुद्री प्रदेश आणि कीनारपट्टी लगतच्या भागांमध्ये साधारण 20 सेंटीमीटर पाऊस पडेल असा अंदाहजी हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम, मुसळधार पाऊस सुरुही झाला आहे. काही ढिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पिकांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकावर मुसळधार पावसाने पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.