Pune Rains: पुण्याच्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या देन महिन्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. राज्यात 1 जून ते 31 जुलै यादरम्यान 538.5 मीटर पाऊस पडतो.

Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

निसर्ग चक्रिवादळापासून यावर्षी महाराष्ट्रातील मॉन्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या देन महिन्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. राज्यात 1 जून ते 31 जुलै यादरम्यान 538.5 मीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात 5 टक्के अधिक पाऊस बसरला आहे. राज्यात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत जुलैअखेरपर्यंत 7 टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र, पावसाची जेमतेम सरासरी गाठलेले जिल्ह्यांच्या यादीत आता पुण्याचाही समावेश झाला आहे. पुण्यात सरासरीच्या तुलनेत 1 टक्के पाऊस कमी पडला आहे. यातच पुण्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील पाऊस कोसळतानाची काही दृश्ये दाखवली आहेत.

राज्यात मागील काही दिवासांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे, जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसही सरसरीच्या तुलनेत मागे पडला आहे. मध्य ममहाराष्ट्रातील सातऱ्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. हे देखील वाचा- Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई सह कोकण किनारपट्टीवर पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता

एएनआयचे ट्विट-

मुंबई परिसर, कोकणातील काही भाग, मराठवाडा, महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढ थांबली असून शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.