Maharashtra Rain Forecast: आज मध्य महाराष्ट्रासह आजूबाजूच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता: हवामान खात्याचा अंदाज
पुढील 48 तास मान्सून साठी पोषक असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये 11 जून दिवशी मान्सूनचं आगमन झालं आहे. त्यानंतर मूंबई, पुणे, नाशिक, कोकण किनारपट्ट्टीवर बरसल्यानंतर आता त्याचा प्रवास उत्तर भारताच्या दिशेने सुरू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. मात्र आता पुढील 48 तास मान्सून साठी पोषक असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या आतील भागात, चांगला पाऊस बरसेल. तसेच आज (26 जून) मध्य महाराष्ट्र आणि आजुबाजूच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा मुंबई हवामान खात्याचा अंदाज आहे. Maharashtra Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रात 28 जून पासून मान्सून साठी अनुकूल हवामानाचे अंदाज, राज्यातील पावसाची आतापर्यंतची टक्केवारी जाणून घ्या.
भारतामध्ये सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस बरसत आहे. काल (25 जून) उत्तर भारतामध्येही पाऊस बरसला. वीज कोसळून बिहार मध्ये मोठा अपघात देखील झाल्याचे वृत्त आहे. 90 पेक्षा अधिक लोकांचा वीज कोसळल्याने दुर्देवी अंत झाला आहे.
K S Hosalikar ट्वीट
कालच मुंबई हवामन खात्याचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुरुवातीचा एक आठवडा म्हणजेच 3 जून ते 10 जून दरम्यान राज्यात सर्वत्र 60 टक्के हुन अधिक पाऊस झाला होता. तर दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10 ते 17 जून दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 60 टक्के हुन अधिक तर मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस झाला होता. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा कोकणात 20 ते 60 % पाऊस झाला तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 60 हुन अधिक टक्के पाऊस होता.