Maharashtra Rain Forecast: राज्यातील 'या' जिल्ह्यांना 4 दिवस सतर्कतेचा इशारा- IMD
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर बसला.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), पुणे (Pune), सांगली (Sangli), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. त्यातच आता पुढील 4 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
29 जुलै रोजी ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 30 जुलै रोजी ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर जिल्हांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 31 जुलै रोजी पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. 1 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. 5 व्या दिवशी कोणताही अलर्ट अद्याप लागू करण्यात आलेला नाही.
K S Hosalikar Tweet:
अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, दरडी कोसळून राज्यात मोठे नुकसाना झाले आहे. अनेकांचे कुटुंब, संसार उद्धवस्त झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सरकारकडून दुर्गटनाग्रस्त आणि पुरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून समाजातील अनेक घटकांना देखील मदतीचे आवाहन केले आहे.