Maharashtra Government Holiday List 2025: महाराष्ट्र सरकारकडून 2025 वर्षासाठी सुट्ट्यांची यादी जाहीर; जाणून घ्या प्रमुख तारखा

संपूर्ण सुट्टीची यादी आणि अतिरिक्त तपशील येथे पहा.

Maharashtra Government releases holiday list for 2025. (Photo credits: Pixabay)

Public Holiday News: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने वर्ष 2025 साठी सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी (Maharashtra Government Holiday List 2025) जाहीर केली आहे. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट, 1881 च्या कलम 25 अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या या यादीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या आणि काही क्षेत्रांसाठी अतिरिक्त सुट्टीच्या तरतुदींची रूपरेषा आहे. यामध्ये प्रामख्याने राष्ट्रीय सण, राज्य आणि देशांमध्ये साजरे केले जाणारे प्रमुख दिवस आणि महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथींचा सामावेश आहे. सुट्ट्यांच्या संपूर्ण यादीसाठी आणि तत्कालीन बदलांसाठी कृपया सरकारी अधिकृत अधिसूचना पहा.

सुट्टीच्या यादीतील प्रमुख तारखा

काही प्रमुख सुट्ट्यांमध्ये खालील दिवसांचा समावेश आहे.

भाऊबीजसाठी अतिरिक्त सुट्टी

24 सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त, सरकारने 23 ऑक्टोबर 2025 ही भौबीजसाठी अतिरिक्त सुट्टी म्हणून घोषित केली आहे. हे राज्य सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महानगरपालिका आणि विविध स्थानिक प्रशासकीय संस्थांना लागू होते. (हेही वाचा, New Year's Eve 2024 Google Doodle: गूगल डूडल साजरी करतंय नवीन वर्षाची संध्याकाळ, सरत्या वर्षाला निरोप)

1 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी

बहुतांश सरकारी कार्यालये कार्यरत राहतील, परंतु वित्तीय खाती बंद करण्यासाठी महाराष्ट्रातील बँका 1 एप्रिल 2025 रोजी बंद राहतील.

साप्ताहिक सुट्टीमुळे सणांच्या सुट्ट्या बुडाल्या

गुढीपाडवा, रामनवमी आणि मोहरम यासह अनेक सुट्ट्या 2025 मध्ये रविवारी येतात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याच्या सुट्ट्यांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळते.

2025 मध्ये महाराष्ट्रासाठी सार्वजनिक सुट्टीची संपूर्ण यादी

Maharashtra Government Public Holiday List 2025

Sr. No. Holiday Date Day
1 Republic Day 26th January, 2025 Sunday
2 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 19th February, 2025 Wednesday
3 Mahashivratri 26th February, 2025 Wednesday
4 Holi (Second Day) 14th March, 2025 Friday
5 Gudhi Padwa 30th March, 2025 Sunday
6 Ramzan-Id (Id-Ul-Fitra) (Shawal-1) 31st March, 2025 Monday
7 Ram Navami 06th April, 2025 Sunday
8 Mahavir Janmakalyanak 10th April, 2025 Thursday
9 Dr Babasaheb Ambedkar Jayanti 14th April, 2025 Monday
10 Good Friday 18th April, 2025 Friday
11 Maharashtra Din 01st May, 2025 Thursday
12 Buddha Pournima 12th May, 2025 Monday
13 Bakri ID (Id-Uz-Zuha) 07th June, 2025 Saturday
14 Moharum 06th July, 2025 Sunday
15 Independence Day 15th August, 2025 Friday
16 Parsi New Year (Shahenshahi) 15th August, 2025 Friday
17 Ganesh Chaturthi 27th August, 2025 Wednesday
18 Id-E-Milad 05th September, 2025 Friday
19 Mahatma Gandhi Jayanti 2nd October, 2025 Thursday
20 Dasara 2nd October, 2025 Thursday
21 Diwali Amavasya (Laxmi Pujan) 21st October, 2025 Tuesday
22 Diwali (Bali Pratipada) 22nd October, 2025 Wednesday
23 Guru Nanak Jayanti 05th November, 2025 Wednesday
24 Christmas 25th December, 2025 Thursday

दरम्यान, महाराष्ट्र सरकारचे सुट्टीचे वेळापत्रक कामाच्या बांधिलकी आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये समतोल साधते. कर्मचाऱ्यांना त्यानुसार त्यांच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या सुट्ट्यांसाठी.