Maharashtra Politics: शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ तर मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाविकास आघाडीतील तब्बल महत्वाच्या १५ नेत्यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
शिंदे फडणवीस सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकामधील विशेष शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील तब्बल महत्वाच्या १५ नेत्यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे दहा खासदार आणि 41 आमदारांना राज्य सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे त्यामुळे आता यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. मागील दोन ते तीन महिन्यात शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णायांना स्थगिती देण्यात आली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे.
गेले काही दिवसांपूर्वीचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता मात्र जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाही. शिवसेनेचे नेते आणि उध्दव ठाकरेंचें निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तरी मलिंद नार्वेकरांची ही वाढीव सुरक्षा अनेकांच्या भुवया उंचवणारी आहे. तरी वाढीव सुरक्षेनंतर नार्वेकर शिंदे गटास आपला पाठींबा दर्शवणार का यावर पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. (हे ही वाचा:- Sharad Pawar: उपचारासाठी पुढील तीन दिवस शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल)
केवळ सरकार मधील नेतेचं नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर चांगलीचं टीका केली जात आहे. एवढचं नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई (Varus Sardesai), संजय राऊत (Sanjay Raut), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal), जयंत पाटील (Jayant Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) तसेच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नितीन राऊत (Nitin Raut), नाना पटोले (Nana Patole), सतेज पाटील (Satej Patil), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)