IPL Auction 2025 Live

Maharashtra Political Crisis: 'शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात...'; राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी केली पंतप्रधान मोदींची निंदा

अजित पवारांच्या अनपेक्षित पक्षांतरानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांना मंत्रालयात पसंतीची पदे मिळवता येणार नसल्यामुळे सेनेचे नेते निराश झाले आहेत.

subramanian swamy

महाराष्ट्रातील राजकारणात रोज नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत. नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात बंड केल्याने राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. अजित पवार यांनी काही आमदारांसह एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतरही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अशात एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते.

सरकारमधील शिवसेनेचे काही आमदार उद्धव ठाकरेंकडे परत येऊ इच्छित असल्याचे अहवाल आज समोर आले आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या फुटीसाठी पंतप्रधान मोदींची निंदा केली आणि म्हटले की, या निर्णयामुळे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडे परत जातील.

स्वामी यांनी ट्विटरवर लिहिले, ‘मी मुंबईत आहे आणि मी ऐकले आहे की शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत येऊ शकतात, कारण मोदींनी आधी त्यांचा वापर केला आणि आता राष्ट्रवादीला फूस लावून शिवसेनेला बाजूला केले.’ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांचा सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

अजित पवारांच्या अनपेक्षित पक्षांतरानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांना मंत्रालयात पसंतीची पदे मिळवता येणार नसल्यामुळे सेनेचे नेते निराश झाले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट म्हणतात, 'राजकारणात जेव्हा विरोधी गट आपल्यात सामील होत असेल तर त्याला घ्यावेच लागते आणि तेच भाजपने केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यात सामील झाल्यानंतर आमच्या गटातील लोक नाराज झाले कारण काही आमच्या नेत्यांना हवे ते स्थान मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने आमचे सर्व नेते खूश आहेत हे खरे नाही. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत कळवले आहे आणि त्यांना हा प्रश्न सोडवावा लागेल.’ (हेही वाचा: राष्ट्रवादी अध्यक्ष Sharad Pawar यांचा अजित पवारांवर घणाघात; बैठकीनंतर समोर आल्या नेते Eknath Khadse, Rohit Pawar, Jayant Patil यांच्या प्रतिक्रिया)

ते पुढे म्हणतात, ‘आम्ही नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात होतो आणि आजही आहे. आम्ही शरद पवारांच्या विरोधात आहोत. उद्धव ठाकरेंचा वापर शरद पवारांनी म्हणून केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सरकार चालवत होते.'