Maharashtra Political Crisis: शिवसेना बंडखोरांना साद, राज्यपालांना टोला; बहुमत चाचणीच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
प्रकरण कोर्टात प्रलंबीत असतानाही बहुमत चाचणीचे आदेश सरकारला देण्यात आले आहेत. आम्ही या विरोधात कोर्टात जाऊ. आमचा न्यायालयावर आजही विश्वास आहे, असी भूमिका शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.
भाजपकडून देशात संविधानाचे धिंडवडे उडविण्याचे काम सुरु आहे. प्रकरण कोर्टात प्रलंबीत असतानाही बहुमत चाचणीचे आदेश सरकारला देण्यात आले आहेत. आम्ही या विरोधात कोर्टात जाऊ. आमचा न्यायालयावर आजही विश्वास आहे, असी भूमिका शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीली महाविकासआघाडी सरकारला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी येत्या 24 तासात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.
राज्यपालांनी दिलेल्या आदेशाबाबत बोलताना संजर राऊत म्हणाले की, याला म्हणायचे जेट स्पीड. जेटपेक्षाही अधिक वेगवान असे हे स्पीड आहे. हे स्पीड यापूर्वी राज्य सरकारने पाठवलेल्या अनेक विषयांवर दाखवता आले नाही. अडीच वर्षांपासून आमच्या सरकारची (मविआ) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची आमदारांची फाईल राज्यपालांकडे पडली आहे. त्यावर राज्यपालांना निर्णय घ्यायला वेळच नाही मिळाला, असा टोलाही संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: बहुमत सिद्ध करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांचे पत्र, महाविकासआघाडी सरकारची कसोटी- सूत्र)
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान आणले आहे. हे विमान वेगवान आहे. त्या विमानाच्या वेगापेक्षाही अधिक वेग राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कामाला पाठिमागील 24 तासात प्राप्त झाला आहे. असे असले तरी, महत्त्वाचा मुद्दा असा की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशकायम असतान अशा प्रकारची बहुमत चाचणी घेता येऊ शकते का? हा खरा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबीत असतानाही अशा प्रकारची कृती होत असेल, तर आम्ही नक्कीच कोर्टात दाद मागू.