Maharashtra Political Crisis: वर्षा बंगल्यावर पार पडली एकनाथ शिंदे गटाची महत्त्वाची बैठक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत मंत्री Uday Samant यांनी दिली महत्वाची माहिती (Watch)

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संघटना मजबूत करण्याचे आदेश दिल्याचे शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यासोबतच राष्ट्रवादी आणि भाजपसोबत समन्वयाने काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Maharashtra Political Crisis: वर्षा बंगल्यावर पार पडली एकनाथ शिंदे गटाची महत्त्वाची बैठक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत मंत्री Uday Samant यांनी दिली महत्वाची माहिती (Watch)
Uday Samant | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिवसभर सुरू असलेले राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही, मात्र या दरम्यान शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या बंडखोर आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्रीपदाला स्वीकृती दिली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल कोणतीही नाराजी नाही असे, शिंदे गटाने सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची सुरू असलेली महत्त्वाची बैठक संपली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या अधिवेशनाच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संघटना मजबूत करण्याचे आदेश दिल्याचे शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यासोबतच राष्ट्रवादी आणि भाजपसोबत समन्वयाने काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आमदारांमध्ये नाराजी नसल्याचा दावा शिंदे यांच्या सेनेकडून करण्यात आला आहे. यासोबतच उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार असल्याचे वृत्त निराधार आहे, ते तसे करणार नाहीत. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महाराष्ट्र सरकारमध्ये दाखल झाल्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. (हेही वाचा: 'शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात...'; राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी केली पंतप्रधान मोदींची निंदा)

सामंत पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे सरकारमध्ये विलीनीकरण हा राजकीय कार्यक्रम असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे घडल्या गोष्टीबाबत आमचा राग नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. राष्ट्रवादीला आघाडीत आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर घेण्यात आला आहे.

आजच्या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. दररोज पक्षाच्या मुख्यालयात बसून जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आणि एकत्रितपणे लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2023 11:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).