Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे गट गुवाहाटीच्या हॉटेलमधून बाहेर, आजच मुंबईत दाखल होण्याची शक्यता
या गटात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांचा समावेश आहे. हा सर्व गट नेमका कोठे निघाला आहे याबाबत उत्सुकता आहे.
पाठीमागील एक आठवड्यापासून गुवाहाटी येथील रेडसन ब्लू हॉटेलमध्ये थांबलेला शिवसेना बंडखोरांचा एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) अखेर बाहेर पडला आहे. या गटात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांचा समावेश आहे. हा सर्व गट नेमका कोठे निघाला आहे याबाबत उत्सुकता आहे. आज सकाळीच गाड्यांचा एक मोठा ताफा हॉटेलमधून बाहेर पडला. दरम्यान, हे आमदार नेमके कोठे रवाना झाले याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे गट हॉटेलमधून बाहेर पडल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गट आजच मुंबईत दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सांगितले जात आहे की, गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शिंदे गट आज दुपारी 12 वाजता मुंबईला रवाना होईल. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: परत फिरा, आजही मला तुमची काळजी वाटते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर शिवसेना आमदारांना अवाहन)
कामाख्या देवीच्या दर्शानसाठी एकनाथ शिंदे हे सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर ते आपल्या गटातील खास आमदारांसोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दाखल झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमे देत आहेत.