Maharashtra Political Crisis: प्रिय शिवसैनिकांनो..! एकनाथ शिंदे याची फेसबुक पोस्ट, बंडाचे कारणही सांगितले

एका बाजूला उद्धव ठाकरे (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात शिवसैनिक (Shiv Sainiks) आक्रमक झाले आहेत.

Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत नेमका कोणाचे पारडे जड होणार याबाबत उत्सुकता कमालीची ताणली आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात शिवसैनिक (Shiv Sainiks) आक्रमक झाले आहेत. शिवसेनेतील हे बंड शमविण्यासाठी आदित्य ठाकरे हे देखील मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या बाजूला ही शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदे गटही ठाम आहे. गुवाहाटी येथील हॉटेलमधून वेगवेगळे व्हिडिओ, पत्रकार परिषद आणि प्रसारमाध्यमांतून प्रतिक्रियांचा धडाका उडवला जात आहे. दरम्यान, या गटाचे म्होरक्या असलेल्या एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर एक छोटीशी पोस्ट लिहीली आहे. ज्यात एकनाथ शिंदे शिवसैनिकांना अवाहन करताना दिसत आहेत. 'माझ्या प्रिय शिवसैनिकांनो', असे म्हणत त्यांनी अवाहन केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,  'प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित.... आपला एकनाथ संभाजी शिंदे.' एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी यापूर्वी अनेकदा महाविकासआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्रास दिला जात असल्याचे म्हटले आहे. अर्थखाते राष्ट्रवादीकडे आहे. अजित पवार हे या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे निधीवाटपातही सापत्नभावाची वागणूक मिळते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सर्वाधिक निधी मिळतो. शिवसेनेचा निधी नेहमीच आडवून ठेवला जातो, अशी टीका या आधीही शिंदे गटाने केली आहे. तोच धागा शिंदे यांच्या पोस्टमधूनही दिसतो आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: 'भाजपने दिलेला शब्द पाळला असता, तर Eknath Shinde मुख्यमंत्री झाले असते'- शिवसेना खासदार संजय राऊत)

ट्विट

Eknath Shinde's Facebook post | (Photo Credit - Facebook)

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथे थांबले आहेत. सुरतमार्गे ते गुवाहाटीला पोहोचले आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. इतकेच नव्हे तर आपला गट म्हणजेच मूळ शिवसेना असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. हा पेच विधिमंडळ आणि पुढे न्यायालयातही दाखल होऊ शकतो.