Police Recruitment: पोलीस भरतीत आणखी एका युवकाचा मृत्यू; राज्यातली तिसरी घटना
अशा काही घटना घडल्यामुळे आता पोलीस भर्ची प्रक्रियेच्या दरम्यानच्या मैदानी चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर काळजी ही पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे.
पुणे येथे सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान तुषार भालके या उमेदवार धाव चाचणीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी असलेल्या तुषार भालके या 27 वर्षीय युवकाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर ही पोलीस भारती प्रक्रिया सुरू होती. (हेही वाचा - Pune Shocker: वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुणे येथील धक्कादायक प्रकार; आरोपीस अटक)
आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास तुषार भालके या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना त्याच्या पायात अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलीस भर्ती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात नेलं पण उपचारादरम्यान त्याचा दूर्दैवी अंत झाला. दरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना असून एसआरपीएफच्या भर्तीत मुंबईत दोन युवक दगावल्याची घटना घडली होती.
राज्यातील अनेक तरुण हे पोलीस भर्तीची वाट ही पाहत असतात आणि त्यात आपली निवड ह्वावी या साठी अहोरात्र प्रयत्न हे करत असतात. पंरतू अशा काही घटना घडल्यामुळे आता पोलीस भर्ची प्रक्रियेच्या दरम्यानच्या मैदानी चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर काळजी ही पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे. पंरतू या उपाययोजनेनंतरही अशा घटना घडत असल्याने सर्वांच्या चिंता या वाढल्या आहेत.