Maharashtra Police Bharti 2021: पोलीस खात्यात 12,538 जागांसठी भरती होणार, गृहमंत्री अनिल देखमुख यांची घोषणा
अनिल देशमुख यांनी सोमवारी राज्यात 12,538 जागांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
Maharashtra Police Bharti 2021: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज पोलीस भरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. अनिल देशमुख यांनी सोमवारी राज्यात 12,538 जागांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती केली जाईल. त्यानंतर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात पोलीस खात्यात नोकरीची संधी उमेदवारांना मिळणार आहे.(Maharashtra Police Bharti 2021 GR Canceled: पोलीस भरती जीआर सरकारने काढला आणि रद्द करुन पुन्हा माघारी धाडला)
अनिल देशमुख यांनी पुढे असे ही म्हटले की, जर गरज भासल्यास पोलीस खात्यात आणखी सुद्धा भरती केली जाईल. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पोलीस नोकर भरतीच्या प्रक्रियेत SEBC आरक्षणाव्यतिरिक्त केली जाईल असे स्पष्ट केले आहे. परंतु याला मराठा संघटनांनी कठोर विरोध दर्शवला. त्यामुळे पोलीस नोकर भरती बद्दल नवा वाद निर्माण झाला. परंतु आज अनिल देशमुख यांनी नोकर भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याामुळे आता मराठा संघटना काय भुमिका घेतली जाणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.(Mumbai Police: अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुरडीची 48 तासांत सुटका; मुंबई पोलिसांनी शेअर केला मायलेकीच्या पुनर्मिलनाचा भावूक क्षण)
याआधी अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरातही अश्वदल पोलीस युनिट सुरु केले जाणार असल्याचे म्हटले होते. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा ठरणार आहे.